;
टाळ बोले चिपळीला, नाच माझ्यासंग देवाजीच्या दारी आज, रंगला अभंग
दरबारी आले, रंक आणि राव सारे एकरूप, नाही भेदभाव गाउ नाचु सारे, होउनी निःसंग
जनसेवेपायी, काया झिजवावी घाव सोसुनिया, मने रिझवावी ताल देउनी हा, बोलतो मृदंग
ब्रम्हानंदी देह, बुडुनीया जाईएक एक खांब, वारकरी होईकैलासाचा नाथ, झाला पांडुरंग
गीत - जगदीश खेबुडकर संगीत - राम कदम स्वर - पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे चित्रपट - भोळी भाबडी (१९७२)
तुला न कळले, मला न कळले कसे प्रीतिचे धागे जुळले !
ते डोळ्यांचे पहिले मीलनते पहिले स्मित, ते संवेदनशब्दाहुन ते गोड मुकेपणकसे कळीचे फूल उमलले ?
थोडी लज्जा, थोडी भीतीओढ अनावर, आतुरता तीकशी जागली हृदयी प्रीती ?कसे मनातुन गीत उजळले ?
स्पर्ष लाजरा होता पहिलाकाळ थांबुनी उभा राहिलाकणाकणातुन वसंत फुललाकुणीकुणाला कसे जिंकिले ?
गीत - शांता शेळके संगीत - सुधीर फडके स्वर - आशा भोसले, सुधीर फडके चित्रपट - कलंकशोभा (१९६१)
रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हाप्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा
आभास सावली हा, असतो खरा प्रकाशजे सत्य भासती ते, असती नितांत भासहसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा
या साजीऱ्या क्षणाला, का आसवे दिठीतमिटतील सर्व शंका, उबदार या मिठीतगवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा
गीत - सुधीर मोघे संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर - महेंद्र कपूर चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)
गगन, सदन तेजोमय तिमिर हरुन करुणाकरदे प्रकाश, देई अभय
छाया तव, माया तवहेच परम पुण्यधाम वाऱ्यातुन, ताऱ्यातुनवाचले तुझेच नामजग, जीवन, जनन, मरणहे तुझेच रूप सदय
वासंतिक कुसुमातुन तूच मधुर हासतोस मेघांच्या धारांतुन प्रेमरूप भासतोस कधि येशील चपल चरणवाहिले तुलाच ह्रुदय
भवमोचन हे लोचन तुजसाठी दोन दिवेकंठातिल स्वर मंजुळभावमधुर गीत नवेसकल-शरण, मनमोहन सृजन तूच, तूच विलय
गीत - वसंत बापट संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर - लता मंगेशकर चित्रपट - उंबरठा (१९८१)
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला !साजणा रे, मोहना रे, ऐक ना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगेसोयरे मी सांडीले पाठी
मोहन मधुर राती भराला येऊ दे प्रीतीप्रीतीची हीच न रीती ?कशाला कुणाची भिती ?झाडामागे चांद हा वरती आला, ये ना, ये ना ? आतुर जीव हा झाला;मी भूलावे, स्वैर व्हावे, गीत गावे !
वाऱ्यात लहर मंदफुलांचा मादक गंधमोगरा चमेली कुंदजीवाला करिती धुंदमाझ्या देही पुनवचांदणे साजे,प्राणांमध्ये प्रीतीची पावरी वाजे;आज राया, धुंद काया मोहवाया
गीत - शांता शेळके संगीत - हेमंत भोसले स्वर - आशा भोसले
© 2008 MarathiJagat. All rights reserved. valid XHTML and CSS | Terms of use | Disclaimer | Increase PR